धाराशिव : केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असे पर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आत्ता सरकारने लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा. देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री […]
तुळजापूर: तुळजापूर तालुक्यात दिवसेंदिवस निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये यशवंत सेनेने विजयाच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. नव्या राजकीय पर्यायाच्या रूपाने मैदानात उतरलेल्या यशवंत सेनेच्या तिन्ही उमेदवारांना मिळणारा जनतेचा वाढता पाठिंबा पाहता सिंदफळ गटामध्ये विजयाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सिंदफळ जिल्हा परिषद गटासाठी पूजा अजित क्षीरसागर, सिंदफळ पंचायत […]
तुळजापूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगरूळ जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापू लागले असून, यशवंत सेनेच्या प्रवेशामुळे संपूर्ण गटात चांगलीच खळबळ उडाली आहे. यशवंत सेनेतर्फे सौ.नीता विकास जाधव यांना मंगरूळ जिल्हा परिषद गटासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू झाला असून, गटातील प्रत्येक गावात यशवंत सेनेचे पिवळे झेंडे फडकताना दिसत आहेत. उमेदवारी […]
