आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली;आपत्ती व्यवस्थापन,महसूल आणि वनविभागाचे सचिवपद स्वीकारणार

प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : राज्य प्रशासनात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला असून कडक आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार, ते आता आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कठोर निर्णयक्षमतेमुळे […]

शिवसेना पक्षात मोठा संघटनात्मक बदल : साळवींच्या जागी माजी खासदार उन्मेष पाटील यांची धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : शिवसेना पक्षात महत्त्वाचा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुखपदावरून राजन साळवी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजी खासदार उन्मेष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजन साळवी यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. […]

सत्य दडपण्याचा प्रयत्न? आ. रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत

प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवणारी एक पोस्ट समोर आली असून, आ. रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भोंदू खरात प्रकरण आणि त्यासंदर्भातील धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य केले आहे. पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही ठिकाणी खरातला आत्महत्या किंवा अन्य कारण […]

श्री तुळजाभवानी देवीला वेदांत कुलकर्णी यांनी केली सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली. वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी […]

धाराशिव जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदल; मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती, प्रियंवदा महाडदळकर यांची सीईओपदी नियुक्ती

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : जिल्हा परिषदेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करत राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मैनाक घोष यांची बदली करून त्यांची सांगली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मैनाक घोष यांनी धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यरत असताना […]

युवा नेते किरण कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ईदच्या शुभेच्छांसह पाणपोईचे उद्घाटन

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : युवा नेते किरण कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरात सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण झाला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली असून, याचा लाभ […]

तुळजापूरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी; सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. तीस दिवसांच्या पवित्र रमजान उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी आज सकाळी इदगाह मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत […]

श्री तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा व महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. पहाटे […]

तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू; गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात भाविकांची […]

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन; सहकुटुंब उपस्थिती

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : सोलापूर येथील नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपमहापौर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी देवकर […]