तुळजापूरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी; सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. तीस दिवसांच्या पवित्र रमजान उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी आज सकाळी इदगाह मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली.

सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. या वेळी शहरात सणासुदीचे आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.

या उत्सवाला विविध राजकीय, सामाजिक तसेच शासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व धर्मीय नागरिकांनीही या सणात सहभागी होत सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे उत्तम उदाहरण घालून दिले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पुढाकारातून इदगाह मैदानावर उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधेमुळे नमाज अदा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

नमाज पठणानंतर इदगाह कमिटीच्या वतीने नगराध्यक्ष विनोद गंगणे तसेच उपस्थित नगरसेवकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रमजान ईदच्या निमित्ताने तुळजापूर शहरात बंधुता, ऐक्य आणि शांततेचा संदेश अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *