तुळजापूरात बच्चुभाऊ कडू यांचे शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना पक्षातून विधान परिषदेवर सदस्यपदी निवड झालेले आमदार बच्चुभाऊ कडू हे आज श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या पुण्य पावन नगरीमध्ये आले होते. त्यांच्या आगमनानंतर तुळजापूर शहरात शिवसैनिक आणि प्रहार सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या बच्चुभाऊ कडू यांचे तुळजापूर शिवसेनेच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत बच्चुभाऊ कडू यांचे स्वागत केले.

या प्रसंगी तालुका उपप्रमुख विकास जाधव, शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, संजय लोंढे, बाळू भैय्ये, संभाजी नेपते यांच्यासह शिवसैनिक व प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी बच्चुभाऊ कडू यांना विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

दरम्यान, बच्चुभाऊ कडू यांनी श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यांच्या तुळजापूर दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *