धाराशिव शहर काँग्रेसला मोठा धक्का ; शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांचा राजीनामा

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अग्निवेश विलासराव शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे धाराशिव शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेल्या पत्राद्वारे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे. २२ मे २०२६ रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात अग्निवेश शिंदे यांनी काँग्रेस […]

जागेच्या वादातून महिलेला मारहाण; धाराशिवमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजियाबी मकबुल सय्यद (वय ५८, रा. शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलीस […]

काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर; युवा नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांत उत्साह

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी युवा व आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या उमेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमेश राजेनिंबाळकर हे धाराशिव […]

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद जागेवर शिवसेनेचा दावा; ज्ञानराज चौगुले इच्छुक?,महायुतीत रस्सीखेच वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्येही काही जागांवरून चुरस वाढताना दिसत असून उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा सध्या विशेष चर्चेत आली आहे. २०१८ मध्ये या जागेवर भाजपच्या तिकिटावर […]

आ.बच्चू कडू यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती

प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षातून शिवसेनेत प्रवेश करून नुकतीच विधानपरिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांच्यावर शिवसेना पक्षाने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांची शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र शिवसेना पक्षाचे […]

तुळजापूरात बच्चुभाऊ कडू यांचे शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना पक्षातून विधान परिषदेवर सदस्यपदी निवड झालेले आमदार बच्चुभाऊ कडू हे आज श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या पुण्य पावन नगरीमध्ये आले होते. त्यांच्या आगमनानंतर तुळजापूर शहरात शिवसैनिक आणि प्रहार सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या बच्चुभाऊ कडू यांचे […]