काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर; युवा नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांत उत्साह

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी युवा व आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या उमेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उमेश राजेनिंबाळकर हे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्ष संघटन व नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क, विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग तसेच ज्येष्ठ व नव्या कार्यकर्त्यांशी असलेला उत्तम संवाद आणि समन्वय ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नव्या उर्जेची गरज असताना युवा नेतृत्वाच्या रूपाने उमेश राजेनिंबाळकर यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या माध्यमातून युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचवली जाईल, अशी अपेक्षा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

राजेनिंबाळकर यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात पक्षवाढ, संघटन बांधणी आणि विविध जनआंदोलनांमध्ये काँग्रेस अधिक आक्रमकपणे मैदानात उतरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *