तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:तुळजापूर शहरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला यात्रा मैदानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस उपस्थित होते. यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी त्यांची भेट घेऊन तुळजापूर […]

काक्रंबा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील समाजबांधवांनी एकत्र येत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव […]

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू; अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आंदोलन

प्रतिनिधी : जुबेर शेख अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे देशातील अनोख्या आंदोलनांपैकी एक मानले जाणारे हे उपोषण कोणत्याही प्रकारच्या सावलीशिवाय, रखरखत्या उन्हात आणि शेतामध्ये […]

जागेच्या वादातून महिलेला मारहाण; धाराशिवमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजियाबी मकबुल सय्यद (वय ५८, रा. शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलीस […]

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद जागेवर शिवसेनेचा दावा; ज्ञानराज चौगुले इच्छुक?,महायुतीत रस्सीखेच वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्येही काही जागांवरून चुरस वाढताना दिसत असून उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा सध्या विशेष चर्चेत आली आहे. २०१८ मध्ये या जागेवर भाजपच्या तिकिटावर […]

आ.बच्चू कडू यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती

प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षातून शिवसेनेत प्रवेश करून नुकतीच विधानपरिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांच्यावर शिवसेना पक्षाने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांची शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र शिवसेना पक्षाचे […]

तुळजापूरात बच्चुभाऊ कडू यांचे शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना पक्षातून विधान परिषदेवर सदस्यपदी निवड झालेले आमदार बच्चुभाऊ कडू हे आज श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या पुण्य पावन नगरीमध्ये आले होते. त्यांच्या आगमनानंतर तुळजापूर शहरात शिवसैनिक आणि प्रहार सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या बच्चुभाऊ कडू यांचे […]

काक्रंबा गावची मुस्कान शेख नवी मुंबई पोलीस दलात; पहिली महिला पोलीस बनत गावाचा मान उंचावला

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथील मुस्कान रोऊफ शेख हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र नवी मुंबई पोलीस दलात निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. काक्रंबा गावातून पोलीस दलात निवड होणारी ती पहिलीच महिला ठरली असून तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्कानच्या या यशाची बातमी गावात समजताच […]

GTS परीक्षेत धाराशिवची हुशार विद्यार्थिनी हुदा सरफराज पठाण हिचे उल्लेखनीय यश

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव:धाराशिव (उस्मानाबाद) येथील गुणी विद्यार्थिनी हुदा सरफराज पठाण हिने GTS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हुदा ही Gulshan-E-Atfal Urdu Primary School, धाराशिव येथील इयत्ता चौथी (उर्दू माध्यम) ची विद्यार्थिनी आहे. अलीकडे जाहीर झालेल्या GTS परीक्षेच्या निकालात हुदाने धाराशिव शहरात प्रथम क्रमांक मिळवला असून आपल्या शाळेतही पहिले स्थान पटकावले आहे. तसेच […]

शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याचा गोठा जळून खाक; लाखोंचे नुकसान, प्रशासनाकडून मदतीची मागणी

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे पाथर्डी येथे शेतकरी नागनाथ भगवान साखरे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत गोठा पूर्णतः जळून खाक झाला असून त्यामध्ये बांधण्यात आलेल्या गायी जागीच जळून मृत्यूमुखी पडल्या. तसेच गोठ्यातील […]