GTS परीक्षेत धाराशिवची हुशार विद्यार्थिनी हुदा सरफराज पठाण हिचे उल्लेखनीय यश

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव (उस्मानाबाद) येथील गुणी विद्यार्थिनी हुदा सरफराज पठाण हिने GTS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हुदा ही Gulshan-E-Atfal Urdu Primary School, धाराशिव येथील इयत्ता चौथी (उर्दू माध्यम) ची विद्यार्थिनी आहे.

अलीकडे जाहीर झालेल्या GTS परीक्षेच्या निकालात हुदाने धाराशिव शहरात प्रथम क्रमांक मिळवला असून आपल्या शाळेतही पहिले स्थान पटकावले आहे. तसेच तालुका स्तरावर सहावा क्रमांक मिळवत तिने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे।

हुदाच्या या यशामागे तिची कठोर मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा मोलाचा पाठिंबा आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करून तिचे अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।

हुदा सरफराज पठाण हिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे तिने सिद्ध केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *