कळंब:शिराढोण (ता. कळंब जि. धाराशिव) – शिराढोण व परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले. सध्या महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी शिराढोण व परिसरातील नागरिकांना कळंब तहसील कार्यालयात जावे लागत आहे. जात, उत्पन्न, निवासी दाखले, फेरफार, […]
लातूर | मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६:लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २३ जागांसह सर्वाधिक यशमिळवून हे सिद्ध केले आहे की, हा जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचाबालेकिल्ला होता आणि आजही तो अभेद्य आहे. लातूरच्या जनतेने जो भरघोसपाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी आणिमाझे सर्व सहकारी अहोरात्र प्रयत्नशील राहू, अशा शब्दांत माजी मंत्रीआमदार अमित विलासराव […]
धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले असून, शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी मिळून सत्तेचा किल्ला मजबूत केला आहे. काही मतदारसंघांत शिवसेना व भाजप आमनेसामने असले तरी बहुतांश ठिकाणी महायुतीचे नियोजन यशस्वी ठरले. भुम, परंडा आणि वाशी मतदारसंघांत शिवसेना व […]
धाराशिव:धाराशिव जिल्ह्यातील भूम–परांडा–वाशी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली आहे. भूम, परांडा आणि वाशी तालुक्यांतील जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवला असून, या यशामुळे मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा स्पष्ट झाला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व १३ जागा लढवल्या होत्या. बहुपक्षीय लढतीत […]
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास घडला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा अजित पवार यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या पदभार स्वीकार समारंभात मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील […]
तुळजापूर : तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आधुनिक ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभर […]
लोहारा : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, लोहारा येथे भव्य प्रचार सभा घेणार आहेत.ही सभा लोहारा येथील बसवेश्वर मैदानात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही प्रचार सभा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक […]
धाराशिव:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मुत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार हे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा पवार यांचे पती असुन तेर, धाराशिवचे जावई आहेत. अजित पवार यांच्या अस्थी तेर येथील डॉ पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत […]
धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रतापराव सरनाईक हे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पालकमंत्री सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांसह विविध ठिकाणी जिल्हा परिषद […]
तुळजापूर:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर,आज आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. विकासाचा ठोस लेखाजोखा सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी […]
