धाराशिव:धाराशिव जिल्ह्यातील भूम–परांडा–वाशी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली आहे. भूम, परांडा आणि वाशी तालुक्यांतील जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवला असून, या यशामुळे मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा स्पष्ट झाला आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व १३ जागा लढवल्या होत्या. बहुपक्षीय लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीसह इतर पक्ष स्वतंत्रपणे मैदानात असतानाही शिवसेनेने प्रभावी कामगिरी केली. सावंत यांच्या रणनीतीमुळे आणि स्थानिक संघटनबळाच्या जोरावर शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले.
जिल्हा पातळीवर पाहता भाजपाने १९ जागा जिंकल्या असल्या तरी शिवसेनेने १५ जागांवर विजय मिळवत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान पटकावला आहे.
विशेष म्हणजे, भूम–परांडा–वाशी या मतदारसंघात शिवसेनेला मिळालेलं यश हे तानाजी सावंत यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक मानलं जात आहे.
स्थानिक विकास, संघटन मजबूत ठेवणे आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केलेल्या नियोजनाचा फायदा शिवसेनेला झाल्याचं चित्र या निकालातून स्पष्ट होत आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने हा निकाल शिवसेनेसाठी बळ देणारा ठरतो आहे.
