लातूर | मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६:लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २३ जागांसह सर्वाधिक यशमिळवून हे सिद्ध केले आहे की, हा जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचाबालेकिल्ला होता आणि आजही तो अभेद्य आहे. लातूरच्या जनतेने जो भरघोसपाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी आणिमाझे सर्व सहकारी अहोरात्र प्रयत्नशील राहू, अशा शब्दांत माजी मंत्रीआमदार अमित विलासराव देशमुख यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आज मंगळवारी सकाळी बाभळगाव निवासस्थानी विजयाचा मोठा उत्साह पाहायलामिळाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्याउमेदवारांनी आमदार देशमुखांची भेट घेऊन शुभेच्छा स्विकारल्या.निवडणुकीच्या निकालानंतर आज आमदार अमित देशमुख यांनी नवनियुक्त सदस्यांशीसंवाद साधला जळकोट, औसा, निलंगा, लातूर आणि उदगीर तालुक्यासह जिल्हयातीलकाँग्रेस आघाडीचे विजयी उमेदवारांनी आमदार अमित देशमुख यांची भेट घेतलीयावेळी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, उपस्थितपदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करुन मतदारांचे विशेष आभार मानले.

