तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या मागणीला यश; तुळजापूर आगाराला पाच नवीन एसटी बस मंजूर

Spread the love


प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : शिवसेना तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तुळजापूर आगारासाठी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी अखेर मान्य झाली असून, तुळजापूर विभागाला पाच नवीन एसटी बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबत अमोल जाधव यांनी काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात तुळजापूर हे राज्याचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज तुळजापूर शहरात ये-जा करत असल्याने विद्यमान बससेवा अपुरी पडत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला होता.

निवेदनात तुळजापूर आगाराला नवीन बसेसचा ताफा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमध्ये वाढ करणे आणि यात्राकाळात विशेष बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर विभागासाठी पाच नवीन एसटी बस मंजूर केल्या आहेत. नवीन बसेस उद्या सेवेत दाखल होणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. तसेच तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे.

या निर्णयाबद्दल अमोल जाधव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले असून, भविष्यातही तुळजापूर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *