अपसिंगा येथे भाजप महायुतीची भव्य जाहीर सभा,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विकासाचे आश्वासन; महायुती उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

Spread the love



तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा (ता. तुळजापूर) येथे आज राज्याचे कर्तबगार महसूलमंत्री तथा भाजप नेते मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या जाहीर सभेच्या प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळून विनम्र अभिवादन केले.

सभेला संबोधित करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध लोकहितकारी योजनाविकासात्मक निर्णय आणि जनतेसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिंदफळ जिल्हापरिषद गटाचे उमेदवार शितल अनंत ढाले,सिंदफळ पंचायत समिती गणातील उमेदवार अनिता सज्जनराव साळुंखे तसेच अपसिंगा पंचायत समिती गणातील उमेदवार मिरा विजय क्षिरसागर या भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तुळजापूर तालुका व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगताना,पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,अशी ठाम ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी उपस्थितांना दिली.महायुती सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या भव्य जाहीर सभेमुळे अपसिंगा गावासह संपूर्ण परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून,कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य,आत्मविश्वास आणि उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रचारसभेस मराठवाडा भाजपचे संघटनमंत्री संजय कौडगे,आमदार राणाजगजितसिंह पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,सुनील चव्हाण,नितीन काळे,तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे,अनिल काळे,सज्जनराव साळुंके,नितीन भोसले,आनंद कंदले,अमिर शेख यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *