अनिल काळे–सुजितसिंह ठाकूर भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण

Spread the love


परंडा : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनी परंडा येथील भाजप संपर्क कार्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पक्ष संघटना, आगामी राजकीय घडामोडी तसेच विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही भेट अशा वेळी झाली आहे की, सोमवारी धाराशिव येथे भाजपचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यातील भाजपमध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू आहे. या या घटनेनंतर त्यांनी थेट संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती.

या प्रकारानंतर भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात असून, पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर ॲड. अनिल काळे यांनी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *