तुळजापूर तहसीलदारांच्या चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

शिवसेना मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या तक्रारीची दखल; गट क्रमांक १२४ मधील गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील गट क्रमांक १२४ मधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव […]

मनसेच्या आक्रमक भूमिकेला यश; निवेदनानंतर तुळजापूरच्या वेतन नगरमधील स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्पुरते थांबले

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यांमध्ये महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, यासंदर्भात महावितरण प्रशासनाला तीव्र निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत तुळजापूर शहरातील वेतन नगर परिसरात सुरू असलेले स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी […]

तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या मागणीला यश; तुळजापूर आगाराला पाच नवीन एसटी बस मंजूर

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : शिवसेना तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तुळजापूर आगारासाठी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी अखेर मान्य झाली असून, तुळजापूर विभागाला पाच नवीन एसटी बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या […]

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:तुळजापूर शहरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला यात्रा मैदानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस उपस्थित होते. यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी त्यांची भेट घेऊन तुळजापूर […]

काक्रंबा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील समाजबांधवांनी एकत्र येत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव […]

जागेच्या वादातून महिलेला मारहाण; धाराशिवमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजियाबी मकबुल सय्यद (वय ५८, रा. शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलीस […]

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद जागेवर शिवसेनेचा दावा; ज्ञानराज चौगुले इच्छुक?,महायुतीत रस्सीखेच वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्येही काही जागांवरून चुरस वाढताना दिसत असून उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा सध्या विशेष चर्चेत आली आहे. २०१८ मध्ये या जागेवर भाजपच्या तिकिटावर […]

तुळजापूरात बच्चुभाऊ कडू यांचे शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना पक्षातून विधान परिषदेवर सदस्यपदी निवड झालेले आमदार बच्चुभाऊ कडू हे आज श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या पुण्य पावन नगरीमध्ये आले होते. त्यांच्या आगमनानंतर तुळजापूर शहरात शिवसैनिक आणि प्रहार सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या बच्चुभाऊ कडू यांचे […]

काक्रंबा गावची मुस्कान शेख नवी मुंबई पोलीस दलात; पहिली महिला पोलीस बनत गावाचा मान उंचावला

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथील मुस्कान रोऊफ शेख हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र नवी मुंबई पोलीस दलात निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. काक्रंबा गावातून पोलीस दलात निवड होणारी ती पहिलीच महिला ठरली असून तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्कानच्या या यशाची बातमी गावात समजताच […]

महिलांना ५०% आरक्षण द्या;तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची आक्रमक भूमिका

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सरकारवर टीका केली आहे. महिलांना केवळ प्रतीकात्मक संधी न देता थेट ५० टक्के राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. धैर्यशील पाटील म्हणाले की, महिलांना जागा वाढवून नव्हे तर […]