उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या धाराशिव जिल्ह्यात प्रचार सभा,जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहाऱ्यात शक्तिप्रदर्शन

Spread the love



लोहारा : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, लोहारा येथे भव्य प्रचार सभा घेणार आहेत.ही सभा लोहारा येथील बसवेश्वर मैदानात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ही प्रचार सभा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली होत असून,शिवसेनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात
या प्रचार सभेच्या नियोजनाची जबाबदारी माजी आमदार ज्ञानराज चौगुले,तुळजापूर व उमरगा-लोहारा जिल्हा प्रमुख मोहन पनूरे तसेच युवा सेना जिल्हा चिटणीस आनंद पाटील यांनी सांभाळली आहे.

सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

शिवसेनेचे उमेदवार रिंगणात
लोहारा तालुक्यात शिवसेना (धनुष्यबाण) पक्षाकडून कानेगाव – सुवर्णा सतीश पाटील,माकणी – सरोजा विजय पाटील,जेवळी – श्रुती मोहन पनूरे या तीन जागांवर उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

तुळजापूर तालुक्यात शहापूर ही एकमेव जागा शिवसेना लढवत असून,उमरगा तालुक्यात शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत.

कवठा – सिद्धेश्वर रघुनाथ माने,कदेर – उषा रवींद्र गायकवाड महायुतीचा दावा, मात्र अनेक ठिकाणी थेट लढत धाराशिव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महायुती झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भाजप व शिवसेना उमेदवार आमने-सामने असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील 55 पैकी 23 जागा शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढवत आहे.

यामध्ये परंडा – 5 जागा,वाशी – 3 जागा,भुम – 5 जागा अशा एकूण 13 ठिकाणी भाजप व शिवसेना उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे.

भुम, परंडा व वाशी तालुक्यांमध्ये महायुती फिस्कटल्याचे स्पष्ट चित्र आहे.याशिवाय माकणी येथे मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने, महायुती असली तरी एकूण 14 जागांवर परस्पर विरोधात उमेदवार उभे आहेत.

शिंदेंच्या भाषणाकडे राजकीय लक्ष
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या प्रचार सभेत
महायुती,स्थानिक विकास,जिल्हा परिषद प्रशासन तसेच अंतर्गत राजकीय संघर्षांवर कोणत्या मुद्द्यांवर भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

लोहाऱ्यातील ही सभा धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक वातावरणावर मोठा प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *