प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : युवा नेते किरण कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरात सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण झाला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली असून, याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला नगरसेवक रणजित भैय्या इंगळे, किरण खपले, रमेश चिवचिवे, अमोल लोंढे, अजित आप्पा काठेवाड, राहुल खपले, आकाश धट, नवनाथ जगताप, अभिजित चिवचिवे, तौफिक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि मित्र परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुतेचा आणि सौहार्दाचा संदेश दिला. अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
