प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यशैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय देत दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता केली आहे. काल धाराशिव येथील कार्यक्रमादरम्यान त्यांनी शहरातील नाट्य सभागृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. विशेष म्हणजे, या घोषणेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
या जलद निर्णयामुळे धाराशिव शहराच्या सांस्कृतिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत. “घोषणा केल्यानंतर २४ तासांत शासन निर्णय जाहीर करून शब्द पाळणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे धाराशिवच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या निधीमुळे धाराशिव शहरातील नाट्य सभागृहाच्या उभारणीला गती मिळणार असून, स्थानिक कलाकार, नाट्यप्रेमी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
