खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र दौरा;आज होणार आढावा बैठकींचा धडाका
तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचे तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना केले अहवान
प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने शिवसेना संसदीय गटनेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या “मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्या”चे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या दौऱ्यात विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये आढावा बैठका घेण्यात येणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात सकाळी १.३० वाजता धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीने होणार असून, त्यानंतर दुपारी २.३० वाजता माढा, ३.३० वाजता सोलापूर येथे बैठका पार पडणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता हिंगोली, ६.३० वाजता परभणी आणि रात्री ७.३० वाजता नांदेड येथे आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकींसाठी संबंधित लोकसभा मतदारसंघातील आजी-माजी खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच महिला आघाडी, युवक सेना आणि विविध विभागीय संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख यांच्यासह सर्व संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी तुळजापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी केले आहे.
या दौऱ्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवणे तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांचा आढावा घेणे यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे समजते.
शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
