सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची विजयाकडे भक्कम वाटचाल , तिन्ही उमेदवारांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण

Spread the love



तुळजापूर: तुळजापूर तालुक्यात दिवसेंदिवस निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये यशवंत सेनेने विजयाच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. नव्या राजकीय पर्यायाच्या रूपाने मैदानात उतरलेल्या यशवंत सेनेच्या तिन्ही उमेदवारांना मिळणारा जनतेचा वाढता पाठिंबा पाहता सिंदफळ गटामध्ये विजयाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे.

सिंदफळ जिल्हा परिषद गटासाठी पूजा अजित क्षीरसागर, सिंदफळ पंचायत समिती गणासाठी तनुजा गणेश व्यवहारे, तर अपसिंगा पंचायत समिती गणासाठी आनंदाबाई गोरख सोनवणे हे यशवंत सेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, तिन्ही उमेदवारांना प्रत्येक गावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक यशवंत सेनेच्या उमेदवारांना खुलेपणाने पाठिंबा देताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, “विकास, पारदर्शकता आणि लोकसेवा” या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिक स्वतःहून पुढे येत प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यशवंत सेनेच्या उमेदवारांनी थेट जनतेशी संवाद साधत स्थानिक प्रश्न समजून घेण्यावर भर दिल्याने मतदारांचा ओढा वाढत चालला आहे.


यावेळी तिन्ही उमेदवारांनी एकमुखाने सांगितले की, “पुढील पाच वर्षांत सिंदफळ गटाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. जनतेने आम्हाला दिलेल्या संधीचे आम्ही विकासाच्या माध्यमातून सोनं करू. नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही.” असे आश्वासन त्यांनी दिले.

गावोगावी मिळणारा प्रतिसाद, प्रचारातील उत्साह आणि मतदारांची सकारात्मक भूमिका पाहता यशवंत सेनेचे उमेदवार जवळपास विजयी होत असल्याचे चित्र सध्या सिंदफळ गटामध्ये दिसून येत आहे. आता केवळ निकालाची औपचारिक घोषणा बाकी असून, येणाऱ्या काळात मतदार बांधव यशवंत सेनेला किती भक्कम पाठिंबा देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *