मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची भक्कम पकड; नीता विकास जाधव विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल

Spread the love

मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची भक्कम पकड; नीता विकास जाधव विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल

तुळजापूर: संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना नव्याने राजकीय मैदानात उतरलेल्या यशवंत सेनेने अल्पावधीतच तालुक्यात प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे. तालुक्यातून पाच जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती उमेदवार देत यशवंत सेनेने सक्षम पर्याय उभा केल्याचे चित्र दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगरूळ जिल्हा परिषद गटातून यशवंत सेनेच्या उमेदवार नीता विकास जाधव यांची उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. नीता जाधव यांनी गटातील प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधला असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विश्वासू, अभ्यासू आणि समाजसेवेची ठाम बांधिलकी असलेले नेतृत्व म्हणून नीता विकास जाधव यांच्याकडे नागरिक मोठ्या आशेने पाहत आहेत. प्रत्येक गावातील स्थानिक प्रश्न, अडचणी आणि विकासाच्या गरजा जाणून घेत त्या निवडून आल्यानंतर प्राधान्याने सोडवण्याचे ठोस आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

“जनतेने मला संधी दिल्यास मंगरूळ जिल्हा परिषद गटात सर्वांगीण विकास कामे करून हा परिसर सुजलाम-सुफलाम केल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा ठाम विश्वास उमेदवारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद, नागरिकांचा वाढता विश्वास आणि गावागावातून व्यक्त होत असलेला पाठिंबा पाहता यशवंत सेनेच्या उमेदवार नीता विकास जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे, असे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. येणाऱ्या काळात मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याकडे संपूर्ण मंगरूळ जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *