भूम–परांडा–वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा; तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात आठ उमेदवार विजयी

धाराशिव:धाराशिव जिल्ह्यातील भूम–परांडा–वाशी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली आहे. भूम, परांडा आणि वाशी तालुक्यांतील जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवला असून, या यशामुळे मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा स्पष्ट झाला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व १३ जागा लढवल्या होत्या. बहुपक्षीय लढतीत […]

तुळजापूर शहरात जिल्हा परिषद शाळेच्या जागेत ‘उमेद मॉल’ उभारणार;आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

तुळजापूर : तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आधुनिक ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभर […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या धाराशिव जिल्ह्यात प्रचार सभा,जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहाऱ्यात शक्तिप्रदर्शन

लोहारा : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, लोहारा येथे भव्य प्रचार सभा घेणार आहेत.ही सभा लोहारा येथील बसवेश्वर मैदानात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही प्रचार सभा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक […]

अस्थी कलश दर्शन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थीचे तेरणा नदीत होणार विसर्जन

धाराशिव:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मुत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार हे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा पवार यांचे पती असुन तेर, धाराशिवचे जावई आहेत. अजित पवार यांच्या अस्थी तेर येथील डॉ पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत […]

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी धाराशिव दौरा; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका

धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रतापराव सरनाईक हे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पालकमंत्री सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांसह विविध ठिकाणी जिल्हा परिषद […]

केवळ आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार’ – खासदार ओमराजे निंबाळकर,आपसिंगा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न;शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी उपस्थिती

तुळजापूर:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर,आज आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. विकासाचा ठोस लेखाजोखा सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी […]

अपसिंगा येथे भाजप महायुतीची भव्य जाहीर सभा,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विकासाचे आश्वासन; महायुती उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा (ता. तुळजापूर) येथे आज राज्याचे कर्तबगार महसूलमंत्री तथा भाजप नेते मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या जाहीर सभेच्या प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित […]

आ. कैलास पाटील यांची प्रचार सभा टाकळी येथे उत्साहात संपन्न

धाराशिव – आ. कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडोळी जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आमोल नागनाथ गुंड (सर), पाडोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमोल उर्फ शंभुराजे मस्के तसेच समुद्रवाणी गणाच्या उमेदवार शाहना तौफीक तांबोळी यांच्या प्रचारार्थ टाकळी येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली.यावेळी बोलताना आ. कैलास पाटील म्हणाले की, “लोकप्रतिनिधी कसा असतो […]

ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव :  केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असे पर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आत्ता सरकारने लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा. देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री […]

सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचा रणसंग्राम;प्रचाराने ढवळून निघाले राजकीय समीकरणे!

सिंदफळ : सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये नव्या राजकीय शक्तीच्या रूपाने उदयास आलेल्या यशवंत सेनेने प्रचाराच्या मैदानात धुमाकूळ घातला असून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.यशवंत सेनेच्या आक्रमक एन्ट्रीमुळे पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण सिंदफळ जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गटामध्येही यशवंत सेनेने दमदार उमेदवार […]