सौदी अरेबियातून अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना शिवसेनेचा दिलासा;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुढाकाराने दोन विमानांची व्यवस्था

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर  : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. इराण-इजराइल तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने Saudi Arabia येथे पर्यटनासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील प्रवासी अडकले होते. या परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप […]

“विरोधात बसू पण फूट पडू देणार नाही” — पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा ठाम इशारा

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या सत्तासमीकरणांच्या चर्चांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “प्रसंगी विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पक्षएकजुटीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य […]

तडवळा साठवण तलावातून होणारा पाणी उपसा वादात; परवानगी तात्काळ रद्द करण्याची शिवसेना शेतकरी सेनेची मागणी, अन्यथा ‘जलसमाधी’ आंदोलनाचा दिला इशारा

प्रतिनिधी : जुबेर शेखतुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे तडवळा येथील तडवळा साठवण तलावातून सुरू असलेल्या पाणी उपसामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीला रस्ते कामासाठी दररोज एक लाख लिटर पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात यापेक्षा अधिक पाणी उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळंब,ढोकी,तेर,बेंबळी,तुळजापूर ते अक्कलकोट रस्ता […]

शिराढोण येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्र्यांना निवेदन; नागरिकांना दिलासा देण्याची मागणी

कळंब:शिराढोण (ता. कळंब जि. धाराशिव) – शिराढोण व परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले. सध्या महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी शिराढोण व परिसरातील नागरिकांना कळंब तहसील कार्यालयात जावे लागत आहे. जात, उत्पन्न, निवासी दाखले, फेरफार, […]

तुळजापूर शहरात जिल्हा परिषद शाळेच्या जागेत ‘उमेद मॉल’ उभारणार;आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

तुळजापूर : तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आधुनिक ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभर […]

अस्थी कलश दर्शन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थीचे तेरणा नदीत होणार विसर्जन

धाराशिव:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मुत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार हे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा पवार यांचे पती असुन तेर, धाराशिवचे जावई आहेत. अजित पवार यांच्या अस्थी तेर येथील डॉ पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत […]

मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची भक्कम पकड; नीता विकास जाधव विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल

मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची भक्कम पकड; नीता विकास जाधव विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल तुळजापूर: संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना नव्याने राजकीय मैदानात उतरलेल्या यशवंत सेनेने अल्पावधीतच तालुक्यात प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे. तालुक्यातून पाच जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती उमेदवार देत यशवंत सेनेने सक्षम […]

सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा

धाराशिव – श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिवच्या मुख्य कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवारी सकाळी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे तज्ज्ञ संचालक सचिन मिनियार यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी […]