धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात;तीन जणांचा जागीच मृत्यू,चार जण गंभीर जखमी

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा येथे भीषण अपघात झाला असून बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या दोन कार एकमेकांना जोरदार धडकल्या. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर वेगात येणाऱ्या वाहनांमध्ये अचानक समोरासमोर धडक झाली. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काहीजण वाहनात अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने धाराशिव शासकीय रुग्णालय व सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी असल्याचे समजते.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *