पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी धाराशिव दौरा; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका

धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रतापराव सरनाईक हे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पालकमंत्री सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांसह विविध ठिकाणी जिल्हा परिषद […]

केवळ आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार’ – खासदार ओमराजे निंबाळकर,आपसिंगा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न;शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी उपस्थिती

तुळजापूर:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर,आज आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. विकासाचा ठोस लेखाजोखा सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी […]

अपसिंगा येथे भाजप महायुतीची भव्य जाहीर सभा,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विकासाचे आश्वासन; महायुती उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा (ता. तुळजापूर) येथे आज राज्याचे कर्तबगार महसूलमंत्री तथा भाजप नेते मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या जाहीर सभेच्या प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित […]

आ. कैलास पाटील यांची प्रचार सभा टाकळी येथे उत्साहात संपन्न

धाराशिव – आ. कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडोळी जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आमोल नागनाथ गुंड (सर), पाडोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमोल उर्फ शंभुराजे मस्के तसेच समुद्रवाणी गणाच्या उमेदवार शाहना तौफीक तांबोळी यांच्या प्रचारार्थ टाकळी येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली.यावेळी बोलताना आ. कैलास पाटील म्हणाले की, “लोकप्रतिनिधी कसा असतो […]

ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव :  केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असे पर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आत्ता सरकारने लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा. देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री […]

मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची भक्कम पकड; नीता विकास जाधव विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल

मंगरूळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची भक्कम पकड; नीता विकास जाधव विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल तुळजापूर: संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना नव्याने राजकीय मैदानात उतरलेल्या यशवंत सेनेने अल्पावधीतच तालुक्यात प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे. तालुक्यातून पाच जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती उमेदवार देत यशवंत सेनेने सक्षम […]

सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचा रणसंग्राम;प्रचाराने ढवळून निघाले राजकीय समीकरणे!

सिंदफळ : सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये नव्या राजकीय शक्तीच्या रूपाने उदयास आलेल्या यशवंत सेनेने प्रचाराच्या मैदानात धुमाकूळ घातला असून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.यशवंत सेनेच्या आक्रमक एन्ट्रीमुळे पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण सिंदफळ जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गटामध्येही यशवंत सेनेने दमदार उमेदवार […]

सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेची विजयाकडे भक्कम वाटचाल , तिन्ही उमेदवारांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यात दिवसेंदिवस निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये यशवंत सेनेने विजयाच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. नव्या राजकीय पर्यायाच्या रूपाने मैदानात उतरलेल्या यशवंत सेनेच्या तिन्ही उमेदवारांना मिळणारा जनतेचा वाढता पाठिंबा पाहता सिंदफळ गटामध्ये विजयाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सिंदफळ जिल्हा परिषद गटासाठी पूजा अजित क्षीरसागर, सिंदफळ पंचायत […]

सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा

धाराशिव – श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिवच्या मुख्य कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवारी सकाळी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे तज्ज्ञ संचालक सचिन मिनियार यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी […]

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सन्मानपूर्ण सोहळा;जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण

धाराशिव : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपस्थितांना शपथ देण्यात आली.या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक श्री.बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर, नामदेव माने,श्रीपती जावळे, बाबुराव तवले,शेषराव बनसोडे […]