सौदी अरेबियातून अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना शिवसेनेचा दिलासा;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुढाकाराने दोन विमानांची व्यवस्था

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर  : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. इराण-इजराइल तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने Saudi Arabia येथे पर्यटनासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील प्रवासी अडकले होते. या परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप […]

“विरोधात बसू पण फूट पडू देणार नाही” — पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा ठाम इशारा

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या सत्तासमीकरणांच्या चर्चांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “प्रसंगी विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पक्षएकजुटीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य […]

तडवळा साठवण तलावातून होणारा पाणी उपसा वादात; परवानगी तात्काळ रद्द करण्याची शिवसेना शेतकरी सेनेची मागणी, अन्यथा ‘जलसमाधी’ आंदोलनाचा दिला इशारा

प्रतिनिधी : जुबेर शेखतुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे तडवळा येथील तडवळा साठवण तलावातून सुरू असलेल्या पाणी उपसामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीला रस्ते कामासाठी दररोज एक लाख लिटर पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात यापेक्षा अधिक पाणी उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळंब,ढोकी,तेर,बेंबळी,तुळजापूर ते अक्कलकोट रस्ता […]

सहलीवर असलेल्या सदस्यांचा रंगोत्सव, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीपूर्वीच एकमेकांना रंग लावून साजरी केली विजयाची होळी

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास महिना उलटत आला आहे, सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यापासून ‘किंगमेकर’ ठरलेले महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर आहेत. सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या ‘फिल्डिंग’मध्ये आता होळीचा […]

शिराढोण येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्र्यांना निवेदन; नागरिकांना दिलासा देण्याची मागणी

कळंब:शिराढोण (ता. कळंब जि. धाराशिव) – शिराढोण व परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले. सध्या महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी शिराढोण व परिसरातील नागरिकांना कळंब तहसील कार्यालयात जावे लागत आहे. जात, उत्पन्न, निवासी दाखले, फेरफार, […]

लातूर काँग्रेसचाच अभेद्य गड! जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध- आमदार अमित विलासराव देशमुख

लातूर | मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६:लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २३ जागांसह सर्वाधिक यशमिळवून हे सिद्ध केले आहे की, हा जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचाबालेकिल्ला होता आणि आजही तो अभेद्य आहे. लातूरच्या जनतेने जो भरघोसपाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी आणिमाझे सर्व सहकारी अहोरात्र प्रयत्नशील राहू, अशा शब्दांत माजी मंत्रीआमदार अमित विलासराव […]

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर महायुतीचे वर्चस्व;शिवसेना शिंदे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट,सेनेचा सत्तेतील दावा भक्कम

धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले असून, शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी मिळून सत्तेचा किल्ला मजबूत केला आहे. काही मतदारसंघांत शिवसेना व भाजप आमनेसामने असले तरी बहुतांश ठिकाणी महायुतीचे नियोजन यशस्वी ठरले. भुम, परंडा आणि वाशी मतदारसंघांत शिवसेना व […]

भूम–परांडा–वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा; तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात आठ उमेदवार विजयी

धाराशिव:धाराशिव जिल्ह्यातील भूम–परांडा–वाशी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली आहे. भूम, परांडा आणि वाशी तालुक्यांतील जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी विजय मिळवला असून, या यशामुळे मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा स्पष्ट झाला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व १३ जागा लढवल्या होत्या. बहुपक्षीय लढतीत […]

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा ऐतिहासिक पदभार स्वीकार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास घडला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा अजित पवार यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या पदभार स्वीकार समारंभात मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील […]

तुळजापूर शहरात जिल्हा परिषद शाळेच्या जागेत ‘उमेद मॉल’ उभारणार;आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

तुळजापूर : तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आधुनिक ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभर […]