प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. तीस दिवसांच्या पवित्र रमजान उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी आज सकाळी इदगाह मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा व महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. पहाटे […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात भाविकांची […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : सोलापूर येथील नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपमहापौर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी देवकर […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धाराशिव रोड ते महाद्वार रोड या मुख्य मार्गावर व्यापारी व इतर व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तुळजापूर हे श्री […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : शहरातील कमान वेस परिसरात बसविण्यात आलेल्या हायमास्ट लाईटच्या पोलवरील दिवे वारंवार बंद पडत असून सध्या पूर्णतः बंद अवस्थेत असल्याने भाविक भक्तांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तुळजापूर हे राज्यासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटेच्या […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा येथे भीषण अपघात झाला असून बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या दोन कार एकमेकांना जोरदार धडकल्या. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर वेगात येणाऱ्या वाहनांमध्ये अचानक समोरासमोर धडक झाली. धडकेचा आवाज इतका […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : शहरातील जामा मस्जिद परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत उपवास सोडला. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून शुक्रवारच्या दिवशी तुळजापूर […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चेत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून अध्यक्षपदी भाजपच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी उषाताई रविंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.उपाध्यक्ष पद हे शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. या निर्णयामुळे महायुतीतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून जिल्हा […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव :केंद्रीय निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) सुरू करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने त्यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची […]
